HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

“…म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते”, गोपीचंद पडळकरांचे जितेंद्र आव्हाडांवर टीका

मुंबई | “दाऊद इब्राहिम होता म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते,त्याच अभासातून कदाचित असे तुच्छ बोल बाहेर पडले असावेत”, अशी टीका भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकरांनी जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.  नुकतेच  जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमातदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या विधानांवरून गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्वीट करत म्हणाले, “मुंब्रारक्षकाचा हे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतो की दाऊद इब्राहिम होता म्हणून ‘पावर’काका मुख्यमंत्री होते,त्याच अभासातून कदाचित असे तुच्छ बोल बाहेर पडले असावेत.ध्यानात ठेवा,हिंदूरक्षक शिवछत्रपती महाराजांच्या शौर्याने व पुण्याईने तुमच्यासारखे काही ‘जितुद्दीन’होता होता राहिले.”

जितेंद्र आव्हाड व्हिडिओमध्ये म्हणाले, “समोर औरंगजेब आहे, म्हणूनच शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे, म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना.” जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ गोपीचंद पडळकर ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, रेणू शर्मा प्रकरणावर पवारांची प्रतिक्रिया

News Desk

बांगलादेशमध्ये हसीना यांचा चौथ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा

News Desk

निजामुद्दीन येथे झालेला प्रकार महाराष्ट्रात होऊ देणार नाही

News Desk