May 24, 2019
HW Marathi
राजकारण

माजी मंत्री दशरथ भांडे यांचा फडणवीस सरकारला अल्टिमेटम

मुंबई। फडणवीस सरकारला सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली आजवर या सरकारने आदिवासींचे प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले मात्र कोणतेही आश्वासन पाळले नाही. फडणवीस सरकारची ध्येय धोरणे भ्रष्ट असून मूळ आदिवासींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही त्यामुळे आदिवासी घटनादत्त अधिकारांपासून आजही वंचित आहे. त्यामुळे आता कोळी महादेव सह इतर आदिवासी जमातींचे प्रश्न तत्काळ निकाली काढा अन्यथा देता की जाता  पुनरावृत्ती करून भाजपला सत्तेतून बाहेर पाडू असा अल्टिमेटम माजी मंत्री दशरथ भांडे यांनी फडणवीस सरकारला दिला.
आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था मुंबई यांच्या वतीने आझाद मैदान येथील धरणे आंदोलनात ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष शाम सोनकुसरे, कर्नल गाळे, संजय तराळे, रामरावजी अडबोल, एकनाथ जुवार, अनिल फुकट, प्रशांत तराळे, विश्वनाथ तायडे, रमेशदादा बावस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, विदर्भ मराठवाडा कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातून कोळी महादेव, माना, गवारी, हलबा कोष्टी, ठाकर, टोकरे , मल्हार कोळी, मांनेवर जमातीचे आदिवासी बांधव तसेच  भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आमदार लक्ष्मण माने बळीराम शिरसाठ,आदि  या आंदोलनात सहभागी झाले होते.
दरम्यान या धरणे आंदोलनात दशरथ भांडे यांनी त्यावेळच्या बेरार म्हणजेच सध्याच्या वऱ्हाड विदर्भ प्रांतातील कोळी महादेव जमातीच्या समस्यांकडे लक्ष वेधले, याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोळी महादेव जमातीतील लोक पूर्वी बेरार प्रांतात सातपुड्याच्या पायथ्याशी वास्तव्यास होते,मध्या प्रदेश आणि महाराष्ट्राचे विभाजन झाल्यावर बेरार हा भाग महाराष्ट्रात आला. मात्र येथील आदिवासी बांधवांना सरकारने नेहमीच दुर्लक्षित ठेवले. आजही त्यांना अनुसूचित जमातींचे जात प्रमाणपत्र दिले जात नाही. वैधता प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे ही जमात आपल्या घटनादत्त अधिकारांपासून वंचित आहे. तरुणांना रोजगार नाही. जात वैधता मिळत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आले. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. हेच मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना आदिवासींचे प्रश्न तत्काळ सोडविण्यासाठी आश्वासन दिले होते मात्र आज केवळ गाजर दाखवत आहेत. त्यामुळे काँग्रेस सरकारला देता की जाता चा इशारा देत सत्तेतून खाली खेचले होते तीच पुनरावृत्ती आता भाजपा सरकारच्या बाबतीत करू असा इशाराही भांडे यांनी यावेळी दिला.
प्रमुख मागण्या –
कोळी महादेव सह हलबा कोष्टी, माना, गोवारी, टोकरे, मल्हार कोळी, मंनेवर जमातींना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे.
– जात वैधता प्रमापात्र देण्यात यावे.
– अस्तित्वात असलेल्या जात पडताळणी समित्या बरखास्त करून TRTI पुणे येथे सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या तज्ज्ञांचा समावेश नवीन समित्यात करावा.
– आदिवासी खात्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी.
– जात पडताळणी समितीतील तोतये संशोधन अधिकाऱ्यांना सेवेतून कमी करावे.
– जात पडत समितीत मानव वंश शास्त्रज्ञांचा समावेश करावा.

Related posts

#LokSabhaElections2019 : कुस्तीपटू योगेश्वर दत्त आता भाजपकडून निवडणुकीच्या उतरणार ? 

News Desk

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

आघाडी सरकारच्या काळात सिडकोला जमीनी दिल्या | मुख्यमंत्री

News Desk