HW News Marathi
राजकारण

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज २८ वी पुण्यतिथी

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (२१ मे) २८ वी पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी तामिळनाडूमध्ये चेन्नईजवळ झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आज देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्लीतील राजघाट येथील ‘वीरभूमी’वर उपस्थिती लावली आहे. त्याचप्रमाणे, पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी, मुलगी प्रियांका गांधी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट करून राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रियांका गांधी यांनी हरिवंश राय बच्चन यांची कविता पोस्ट करत आपले पिता राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेत्यांच्या आवडीचा विषय म्हणजे बदल्या !

News Desk

राम कदमांना कुणीही उमेदवारी देऊ नका | उद्धव ठाकरे

News Desk

रामदास आठवले हे प्रामाणिक कार्यकर्ते | राजा ढाले

News Desk