HW Marathi
राजकारण

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत !

मुंबई | “राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्याच पध्दतीने सीबीएसई व आयसीएसई या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नयेत, अशी सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

“राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आले नसल्याने अकरावी प्रवेशावेळी सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहीत न धरता केवळ लेखी परीक्षेचे गुण गृहीत धरावेत. त्या गुणांच्या आधारवर अकरावीचे प्रवेश देण्यात यावे”, अशी सूचना विनोद तावडे यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर करण्यात आली आहे.

“मुख्याध्यापक आणि पालक यांनी दिलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे गुण अकरावी प्रवेशासाठी गृहीत धरल्यास, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणता येईल, असा विचार मुख्याध्यापक आणि पालकांनी आज झालेल्या बैठकीत मांडला”, असे तावडे यांनी सांगितले.

Related posts

अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

येडियुरप्पा-डी. शिवकुमार यांच्या भेटीने कर्नाटकात सत्ता बदलाच्या चर्चेला उधाण

News Desk

माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची प्रकृती खालावली

News Desk