नवी दिल्ली | “देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या विराट नौकेचा वापर आपल्या कुटुंबाच्या खासगी सुट्यांसाठी माजी पंतप्रधानांनी केला होता,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राजीव गांधीवरून काँग्रेसवर टीका केली. मोदींनी काल (८ मे) दिल्लीच्या रामलीला मैदानातातील प्रचारसभेत म्हटले आहे.
#WATCH PM Modi in Delhi: At the time when, INS Virat was positioned for protection of maritime boundaries, it was sent to take Rajiv Gandhi and his family to an island for their holiday. Even his in-laws were onboard INS Virat. Was it not a compromise of national security? pic.twitter.com/3RXdtJHF2m
— ANI (@ANI) May 8, 2019
“राजीव गांधी पंतप्रधान असताना दहा दिवसांच्या सुट्टीसाठी ते आपल्या कुटुंबासोबत एका खास बेटावर गेले होते. यावेळी राजीव गांधींसोबत त्यांच्या सासरचे लोकही होते. गांधी परिवाराने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आयएनएस विराटचा वापर केला असल्याचा, आरोप नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला,” असे वक्तव्य मोदींनी प्रचारसभेत म्हणाले आहे.
PM Modi addressing a public rally in Delhi: Even Navy personnel were put on service of Rajiv Gandhi and his family while they were vacationing at the island. INS Virat was also stationed at the island for 10 days during that time. https://t.co/UbZH1pkYYV
— ANI (@ANI) May 8, 2019
‘‘आयएनएस विराटचा वापर करणे हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा प्रश्न मोदी यांनी विचारला. ते म्हणाले, ‘काँग्रेसने नेहमीच देशाच्या सुरक्षेशी खेळ केला आहे. २०१४ च्या आधीची परिस्थिती आठवून बघा त्यावेळी लोकांना भीती असायची की कुठे काही होतेय का? परंतु, आता देश बदलला आहे.’
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.