HW News Marathi
राजकारण

गंभीरने मुख्यमंत्री केजरीवालांसह ३ जणांवर ठोकला मानहानीचा दावा

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पूर्व दिल्लीच्या आपच्या उमेदवार आतिशी मारलेना यांच्या विरोधात माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे पूर्व दिल्लीचे उमेदवार गौतम गंभीर यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे. गौतम गंभीर यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे. अतिशी यांनी गौतम गंभीर यांच्यावर वादग्रस्त मजकूर लिहिलेली पत्रके वाटल्याचा आरोप गुरुवारी (९ मे) केला होता. दरम्यान, हा आरोप फेटाळून लावत आता गौतम गंभीर यांनी मानहानीचा दावा ठोकला आहे.

तुमच्याकडे पुरावे असतील तर ते दाखवा. तुमच्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मी राजकारण सोडेन. मी माझ्या प्रचारादरम्यान कोणाविरुद्धही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही. याउलट अतिशी याच माझ्यावर खोटे आरोप लावून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे गौतम गंभीर यांनी गुरुवारीच सांगितले होते. यावेळी गंभीर यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

“राजकारणात अरविंद केजरीवालसारखे लोक आहेत म्हणूनच चांगली लोकं राजकारणात येत नाहीत. अरविंद केजरीवाल माझ्या राज्याचे मुख्यमंत्री याचीच मला लाज आहे. माझ्या घरी ५ महिला आहेत. त्यामुळे महिलांचा आदर कसा राखावा हे मी पूर्णपणे जाणतो. कोणत्याही महिलेला अशा प्रकारच्या घटनेला सामोरे जावे लागू नये”, असेही गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

Aprna

दुसऱ्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज तहकूब

News Desk

आघाडी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकीत यश मिळणार !

News Desk