HW News Marathi
राजकारण

उद्धव यांना ‘मोस्ट कन्फ्युज्ड पॉलिटिशियन’ पुरस्कार द्या | विखे पाटील

मुंबई | ‘जय शिवाजी जय भवानी’ अशा घोषणाच शिवसेनेचे नेते देत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख बाहेर जाऊन भाषणे देत आहेत. ‘ना तळ्यात ना मळ्यात’ अशी शिवसेनेची भूमिका झाली असल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोस्ट कन्फ्युज्ड पॉलिटिशियन’ असा पुरस्कार द्यावा, अशी टीका विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्याबाबत सरकार जेव्हा बैठक घेत होते तेव्हा शिवसेनेचे सुभाष देसाई त्यावेळी उपस्थित होते. खरंतर त्याचवेळी त्यांनी विरोध करत बैठकीतुन उठून जायला पाहिजे होते. ते बैठकीत केवळ डोसा खायला गेले होते का ? असा सवाल विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी करत शिवसेनेवर निशाणा साधला. शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी झाली तेव्हा शिवसेनेचे नेते गप्प का होते. स्मारकाची उंची कमी झाल्यामुळे शिवसेना नेते विरोध करतील आणि दसरा मेळाव्यात याबाबत घोषणा करतील, असे मला अपेक्षित होते. पण असे काहीच झाले नाही. यावरून शिवसेना पक्षाची राजकारणात उंची कमी झाल्याचे दिसून आले असल्याची टीकाही विखे पाटलांनी केली आहे.

शिवस्मारकाची उंची तसेच त्याचा आराखडा बदलल्याने त्याची मूळ किंमत १३०० कोटींनी कमी झाली आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ३ हजार ८२६ कोटी इतकी होती. ती २ हजार ५०० कोटींवर आणण्यात आली. त्यासाठी मूळ आराखड्यात अनेक बदल केले. किंमत कमी करण्यामागे सरकारचा नेमका घोटाळा काय आहे याबाबत आम्ही येणा-या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे विखे पाटील म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यपालांच्या भाषणादरम्यान उत्तर प्रदेश विधानसभेत मोठा गदारोळ

News Desk

शरद पवारांची मानसिकता राजेशाही, आम्ही मात्र जनतेचे सेवक !

News Desk

महाराष्ट्रात आलेले पहिले उत्तर भारतीय प्रभू राम होते !

News Desk
राजकारण

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी झालेल्या स्पीडबोटच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. शिवसंग्रामचे संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्यावर अजित पवार यांनी आरोप केले आहेत. ‘विनायक मेटेंना स्वत:चे महत्व वाढवायचे होते का ?’ असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे.

स्पीड बोटीच्या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांना कोणतीही कल्पना न देता कंत्राटदार आणि सल्लागारांनी स्मारकाच्या रचनेत स्वतःला हवेत तसे बदल केले आहेत, असा गंभीर आरोप केला होता. मेटे यांनी शिवस्मारकाच्या बांधकामातील अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली होती. चौकशी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारादेखील त्यांनी दिला होता.

दरम्यान, या अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘शिवस्मारकासाठी कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना कंत्राटदारांकडून फक्त काम सुरु केल्याचे दाखवून सरकार जनतेच्या डोळयात धुळफेक करत आहे’, असा आरोप केला होता.

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटचा काल (बुधवार) एका खडकाला आदळून अपघात झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यसचिव देखील या बोटीतून प्रवास करत होते. पहिल्यांदा बोटीतील सर्वच जण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर १ व्यक्ती बेपत्ता असल्याचे लक्षात आले. ती व्यक्ती बुडाल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. त्यानंतर काही वेळात त्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्या मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश पवार असे आहे.

Related posts

ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची शिवसेनेच्या प्रवक्तेपदी निवड

Aprna

लाचारी माझ्या रक्तात नाही, माझ्या वडिलांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला !

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

Aprna