बारामती | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेतील संचालक मंडळाने आणि कर्ज मंजुरी समितीने अनेक सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांचे संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे .याच कारवाईच्या निषेधार्थ शरद पवार यांच्या समर्थकांकडून बुधवारी (२५ सप्टेंबर) बारामती आणि पुण्यात बंद पाळण्यात येत आहे. दरम्यान, आता याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
'Baramati Bandh' has been called by Sharad Pawar supporters?
This is ridiculous….
Chori toh chori, uppar se sina jori
Go keep your Baramati Bandh forever, who cares. This shows that you are now limited only to Baramati
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) September 24, 2019
“शरद पवारांच्या समर्थकांनी बारामती बंदची हाक देण्यात आली आहे. हे हास्यास्पद आहे. ‘चोरी तो चोरी उपरसे सिना जोरी’. तुमची बारामती कायमची बंद ठेवा, कोणाला फरक पडतो ? मात्र, यातून हे सिद्ध होते कि तुम्ही केवळ बारामतीपुरतेच मर्यादित आहेत”, अशा आशयाचे ट्विट अंजली दमानिया यांनी केले आहे. अंजली दमानिया यांनी यापूर्वी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून टीका केली होती. कोहिनुर मिल ३ प्रकरणी राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह चौकशीसाठी ईडी कार्यलयाकडे रवाना झाले होते. याचवरुन अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता.
राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) August 22, 2019
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत घोटाळ्याप्रकरणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह ७० नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही बातमी येताच पुण्यासह बारामतीमध्ये त्याचे पडसाद उमटले. शरद पवारांवर होणाऱ्या या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंडईतील टिळक पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात येणार आहेत. तर बारामतीत स्थानिकांनी, पवार समर्थकांनी कडकडीत बंद पाळला आहे. या कारवाईच्या माध्यमातून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.