मदुराई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२७ जानेवारी) तामिळनाडुतील मदुराई दौऱ्यावर जाणार आहेत. मोदींच्या तामिळनाडूमधील ऑल इंडिया इंस्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्सच्या (AIIMS) इमारतीच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यासाठी थोप्पुरला भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील मोदींच्या दौऱ्याला काही स्थानिक नागरिकसह एमडीएमकेचे प्रमुख वायको यांच्या नेतृत्वाखाली विरोध प्रदर्शन केली जात आहे.
Madurai, Tamil Nadu: Visuals of protest led by MDMK Chief Vaiko against PM Narendra Modi’s visit to the city today. pic.twitter.com/X8OtzJmMPV
— ANI (@ANI) January 27, 2019
यामुळे मोदींना ट्विटरवर “गो बॅक मोदी” असा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. शनिवारी सायंकाळी या ट्रेंडला सुरुवात झाली असून रविवारी सकाळी ९.३० वाजेपर्यंत २.५० लाख ट्विपल्सने हा हॅशटॅग ठेऊन मोदींच्या दौऱ्याला आपला विरोध दर्शवला आहे. ट्विटरवर गेल्या 12 तासांपासून #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आहे. दरम्यान, #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंड झाल्यानंतर, मोदी समर्थकांनीही #TNWelcomesModi असा ट्रेंड ट्विटरवर सुरू केला असून तोही #GoBackModi च्या खालोखाल ट्रेंड करत आहे.
यापूर्वीही एप्रिल २०१८ मध्ये तामिळनाडूच्या दौऱ्यावर असताना अशाचा विरोधाचा सामना मोदींना करावा लागला होता. त्यावेळीही विरोधकर्ते काळे झेंडे घेऊन मोदींविरोधात रस्त्यावर उतरले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.