HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

काँग्रेसमध्ये मेहनत करणाऱ्यांपेक्षा गुंडांना महत्व दिले जाते, प्रियांका चतुर्वेदींचा घरचा आहेर

नवी दिल्ली | “काँग्रेसमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या गुंडांना महत्व दिले जाते”, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर देत पक्षाबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांच्या मथुरा येथील राफेलसंदर्भातील पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रियंकाशी गैरवर्तन केले. याबाबत तक्रार केल्यानंतर दोषी आढळलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशचे प्रभारी जोतिरादित्य सिंधिया यांनी हस्तक्षेप करत या पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द केले. इतकेच नव्हे तर त्यांना पुन्हा त्यांची पदे देखील दिली. यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाबद्दल प्रचंड नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

प्रियंका यांनी त्या पदाधिकाऱ्यांवरील निलंबन रद्द केल्याबाबतचे पत्र देखील रिट्विट केले आहे. “प्रियंका चतुर्वेदी राफेल कराराबाबत पत्रकार परिषद घेण्यास आल्या त्यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. या पदाधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंग केल्याबद्दल कारवाई देखील करण्यात आली. मात्र त्यांनी याबाबत खेद व्यक्त केल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचे प्रभारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शिफारशीनंतर या पदाधिकाऱ्यांना पुन्हा त्यांची पद बहाल करण्यात आली आहेत”, असे या पत्रात म्हणण्यात आले आहेत.

Related posts

पवारांची मुलाखत चोरूनही पाहिली नाही – उद्धव ठाकरे

News Desk

रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

News Desk

राज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk