HW News Marathi
राजकारण

एनडीएच्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत ?

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (२१ मे) म्हणजेच लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याच्या अवघ्या २ दिवसांपूर्वी एनडीएच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी ७ वाजता अशोका हॉटेलमध्ये ही बैठक सुरु होईल. या बैठकीत एकूण एनडीएचे २९ नेते आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण काय ? याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात असले तरी यामागचे खरे कारण काही औरच आहे.

उद्धव ठाकरे हे सध्या आपल्या कुटुंबीयांसह परदेश दौऱ्यावर आहेत. ते आज (२१ मे) मुंबईत दाखल होतील. त्यामुळे ते आजच्या एनडीएच्या बैठकीस उपस्थित राहू शकणार नाहीत. शिवसेनेचे काही नेते आपापल्या मतदारसंघात व्यस्त आहेत, तर काही नेते पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहतील. यामागे शिवसेनेची कोणत्याही प्रकारची नाराजी नाही, असेही म्हणण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

Aprna

शिवसेना प्रवेशासंदर्भात पवारांनी घेतली भुजबळांची भेट

News Desk

भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये 7 नोव्हेंबरला येणार; अशोक चव्हाणांची माहिती

Aprna