बीड | उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपाच्या सुरेश धस यांना 526 मतांनी विजय मिळाला आहे. या निवडणुकीत 527 मतदार काँग्रेस-राष्ट्रवादीचे होते तर भाजपाकडे 321 मते होती. मात्र, तरीही सुरेश धस यांनी 526 मते मिळवत राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंचा पराभव केला.
4 मतांच्या मताधीक्याने मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीपासूनच सुरेश धस यांनी आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली व ती शेवटपर्यंत आणखी वाढवत नेली. त्यांना एकूण 526 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या अशोक जगदाळेंना 452 मते मिळाली. याशिवाय, 25 मते तांत्रिक कारणामुळे बाद ठरवण्यात आली. एका मतदाराने नोटासाठी मतदान केले. त्यामुळे पुरेसे संख्याबळ नसताना सुरेश धस यांचा विजय कसा झाला हा प्रश्न उपस्थित होतोय.
1006 मतांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, भाजपचे 321 ,शिवसेनेचे 64 आणि 94 अपक्ष मतदार होते. त्यामुळे जवळपास 100 मतं कमी असलेली भाजपाने पुरेसे संख्याबळ नसताना विजय कसा मिळवला हा प्रश्न उपस्थित होतो. सुरेश धस हे पूर्वीपासूनच आपला विजय होणार हे ठासून सांगत होते. मात्र ते आकडे कसे जुळवणार हाच प्रश्न होता. पण त्या प्रश्नाचे उत्तर धस यांनी विजय मिळवून दिले आहे. धस यांच्या या विजयावरुन त्यांनी आपली मते तर मिळवलीतच, शिवाय विरोधीपक्षांचीही मते मिळवली .
विजयानंतर सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना या निवडणुकीत मला ‘घड्याळ’ असलेल्या अनेक हातांनी मदत केली असे सांगितले. राष्ट्रवादीने मतांसाठी अनेक आयफोन वाटले होते. तरीही त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आजचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला विजय आहे, असे धस यांनी म्हटले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.