HW News Marathi
राजकारण

#HappyBdayPMModi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने ट्वीटरवर ७ हॅशटॅग्‍स ट्रेंडिंग

मुंबई | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६९ वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने देश-विदेशातील अनेक व्यक्ती आणि नेते मंडळींनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीटरवर आज (१७ सप्टेंबर) ८ पैकी ७ ट्रेंड हे मोदींच्या वाढदिवसावर आहेत. यात #HappyBdayPMModi, #HappyBirthdayPM, #NarendraModiBirthday, #happybirthdaynarendramodi #PrimeMinister , Modiji, Shri, यासारखे हॅशटॅग्‍स ट्वीटरवर ट्रेंडिंग होत आहेत.

देशातील अनेक नेते मंडळींसह मोदींच्या चाहत्यांनी या हॅशटॅग्सच्या माध्यामतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ७ पैकी कोणत्याही हॅशटॅग्सचा वापर करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतात. मोदींची लोकप्रियता भारतच नव्हे तर देशाबाहेर देखील आहे.

मोदींचे घनिष्ठ मित्र आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा ट्वटीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्वीटमध्ये शहांनी म्हटले की, ““दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व आणि अथक परिश्रमचे प्रतिक देशातील सर्वात लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या नेतृत्वात भारताने जगात एक मजबूत, सुरक्षित आणि विश्वसनीय देशाच्या रुपात आपली ओळख बनवली आहे.”, असे ट्वीट अमित शाह यांनी केले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेला 12 वर्षे पूर्ण, पक्ष टिकवण्याचे राज ठाकरेंपुढे आव्हान

News Desk

जाणून घ्या… आज महाराष्ट्रातील सत्तांतराच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले?

Aprna

राष्ट्रपतींनी स्वीकारला एम.जे.अकबरांचा राजीनामा

News Desk