कल्याण | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भारतरत्न’ पुरस्कारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर फैऱ्या झाडल्या आहे. ओवेसी म्हणाले की, “मला आता तुम्ही सांगा की, जेवढ्यांना भारतरत्न दिले गेले, त्यापैकी किती दलित, आदिवासी, मुस्लिम गरीब, उच्च जातीतील लोक आणि ब्राह्मणांचा समावेश आहे?. बाबासाहेंबांना भारतरत्न दिले, परंतु हा पुरस्कार मनापासून दिला गेला नाही. तर नाईलाजमुळे भारतरत्न द्यावे लागले,” असे बोलून काँग्रेसवर निशाणा साधला.
Asaduddin Owaisi at an event in Maharashtra y'day: Mujhe yeh batao ki jitne Bharat Ratna ke award diye gaye usmein se kitne dalit, adivasi, musalmanon, garibon, upper caste aur Brahminon ko diye gaye? Babasaheb ko Bharat Ratna diya par dil se nahi diya majboori ki halat mein diya pic.twitter.com/8P0V0Ncr3H
— ANI (@ANI) January 28, 2019
कल्याणच्या एपीएमसी ग्राउंडवर वंचित बहुजन आघाडीची रविवारी (२७ जानेवारी) जाहीर सभा झाली होती. यावेळी भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप-शिवसेना सरकारच्या कारभाराचा खरपूस समाचार घेतला.
तसेच पुढे ओवेसी असे देखील म्हणाले की, “मी तोडण्यासाठी आलो नसून जोडण्यासाठी आलो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे. जातीय दंगलीवरून ओवेसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीकास्र सोडले. शीख दंगलीवरून ओवेसी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. देशाला चौकीदाराची गरज नाही, तर पैलवानाची गरज आहे अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.