HW News Marathi
राजकारण

HW Exclusive : ठाकरे गटाकडून ‘मशाल’ चिन्हावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

मुंबई | केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission) शनिवारी ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह  तात्पुरत्या स्वरुपात गोठवले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर आज (9 ऑक्टोबर) शिवसेनेच्या नेते, उपनेते, आमदार आणि खासदार यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर चर्चा केली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेतून एकमताने ‘मशाल’ या चिन्हावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर पक्षाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ आणि शिवसेना ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे दोन नाव पक्षाची नावे निश्चित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. ठाकरे गट उद्या (10 ऑक्टोबर) निवडणूक आयोगाकडे पर्यायी चिन्ह आणि पक्षाचे नाव सादर करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, मातोश्रीवर आज घेतलेली बैठक दीड तास सुरू होती. या बैठकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निश्चित केली आहे. या पक्षाच्या नावत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या नावात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नावात दोन पिढ्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे. तसेच बैठकीत ठाकरे गटाने त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या तिन्ही चिन्हांवर चर्चा झाली. परंतु, बैठक संपण्यापूर्वी ठाकरे गटाने मशाल या चिन्हावर शिक्कामोर्तब केला आहे. आता ठाकरे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत चिन्ह आणि पक्षाचे नाव आयोगाकडे सादर करायचे आहे. उद्या निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

 

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आगामी अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला नव्या चिन्ह आणि पक्षाच्या नावावर सामोरे जावे लागेल. कारण अंधेरी पूर्व विधानसभा मंतदारसंघातील पोटनिवडणुकीची नुकतीच घोषणा झाली आहे. त्यानुसार, 7 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत पोटनिवडणुकीतील उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची तारीख असून 3 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील निकाल हातील येतील. आधीच उमेदवारांकडे प्रचारासाठी वेगळ कमी आहे. यात चिन्ह आणि पक्षाचे नाव दोन्ही नवीन असल्याने लोकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी कमी वेळ आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचा अनोख्या पद्धतीने निषेध

Gauri Tilekar

…तोपर्यंत विरोधी पक्षाने नाकावरचा ‘मास्क’ तोंडात बोळा म्हणून वापरावा !

News Desk

विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन; विधानसभा अध्यक्षाच्या पदासाठी आज होणार निवडणूक

Aprna