HW News Marathi
राजकारण

“शिवसेना संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल”, शरद पवारांचा विश्वास

मुंबई | “शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल”, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. औरंगाबादेत शरद पवारांनी आयोगाच्या निर्णयासह पक्षाचे चिन्ह, निवडणूक आयोग, महाविकास आघाडी आणि अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणूक आदी मुद्यांवर बोललेत.

आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना संपेल असे म्हटले जाते, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “शिवसेना अजिबात संपणार नाही. शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवेल. या निर्णयानंतर महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही. असे आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. हे कायम एकत्र राहतील, यात काही शंका नाही. आताजी पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे.”

 आयोगाच्या निर्णयाचे आर्श्चय वाटत नाही

“मला अजिबात आर्श्चय वाटत नाही. हो होणार याची मला खात्री होती”,असा टोला शरद पवारांनी आयोगाला लगावला आहे. शरद पवार पुढे म्हणाले, “हल्ली निर्णय कोण घेते, हे मला माहिती नाही. निर्णय हे गुजरातवरून घेतले जातील, यांची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असे काही तरी घडेल, हे गेल्या काही दिवसांपासून वाटते होते, ते घडले. पण, असे घडेल, असे मला माझे मन सांगत होते.”

चिन्हा असो वा नसो, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा

निवडणुकीच्या चिन्हासंदर्भात शरद पवार म्हणाले, “पुढे निवडणुकांना जर जायाचे असेल, आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल. ती जे चिन्ह ठरवेल, ते चिन्हा शेवटपर्यंत टिकेलच, असे सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्हा असो वा नसो, निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. नवीन चिन्हा घेईचे आणि निवडणूक लढवायची.”

 

 

Related posts

UP मध्ये मराठी भाषा शिकवा; भाजपच्या ‘या’ नेत्याने योगींना लिहिले पत्र

Aprna

मायावतीला धक्का, आयोगाच्या कारवाईवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

News Desk