HW News Marathi
राजकारण

HW Exclusive :”…शिवसैनिकांना वाचवण्यासाठी बोलते, तेव्हा मी खूप मोठी नेता,” दीपाली सय्यद यांचा राऊतांना टोला

मुंबई | “शिवसैनिकांना वाचवण्यासाठी बोलते, तेव्हा मी खूप मोठी नेता, तेव्हा मी खूप छान पद्धतीने बोलते,” असा टोला शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित एकनाथ शिंदे हे दोघे भेटणार असल्याचे ट्वीट दीपाली सय्यद यांनी काल (16 जुलै) केले आहे. या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. यानंतर राऊतांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हणाले, ” सय्यद यांनी अशा प्रकारची वक्तव्ये खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.” या संदर्भात एच. डल्ब्यू. मराठीने दीपाली सय्यद यांनी शिवसैनिक आणि कार्यकर्त्या म्हणून आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे ते म्हणाले.

तुम्ही तुमच्या भावना ट्वीटद्वारे बोलून दाखविल्यानंतर संजय राऊत यांनी दिलेल्या सल्लाबद्दल तुम्हाला काय वाटते, संदर्भात एच. डब्ल्यू. मराठीच्या पत्रकारांनी विचारलेल्या दीपाली सय्यद म्हणाले, “संजयसाहेब ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना सर्वजण फॉलो करतात. आजपर्यंत त्यांनी आपली भावना आहे ती व्यक्त केली आहे. मग ती कुठल्याही शब्दात असो, कधी उलट्या शब्दात किंवा खालच्या शब्दात, असे ते बोलत असतात. आजपर्यंत मी सुद्धा गेली 3 वर्षपासून मी शिवसैनिक म्हणून काम करते. आज मी सुद्धा तीन वर्ष झाले मी शिवसेनेत काम करते. तीन वर्षात मी जेव्हा जेव्हा शिवसेनेवर आघात आलेला आहे.  कुठेही समस्या तेव्हा तो मी आघात घात मी माझ्यावर घेतलेला आहे. शिवसैनिकांना वाचवण्यासाठी मी आघात घेते, तेव्हा मी खूप मोठी नेता, तेव्हा मी खूप छान पद्धतीने बोलते. मग आज मला का? तो अधिकार नाही? की, मी आज माझ्या भावना व्यक्त करू. तो अधिकार सर्वांना आहे. शिवसैनिक, कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे तो अधिकार आहे. मी अभिनेत्री तर आहेच. त्याबरोबर मी एक शिवसैनिक पण आहे. आणि मला तो अधिकार आहे.”

संजय राऊत नेमके काय म्हणाले

सय्यद यांच्या ट्वीटवर राऊत म्हणाले, “दिपाली सय्यद या अभिनेत्री असून त्या पक्षाचे काम करतात. सय्यद त्यांना कोणी हे अधिकार दिले हे मला माहिती नाही. त्या शिवसेनेच्या नेत्या नाहीत, त्या फक्त पदाधिकारी आहेत. तसेच शिवसेनेच्या प्रवक्त्या देखील नाहीत. त्यामुळे सय्यद यांनी अशा प्रकारची वक्तव्ये खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहेत, असे ते म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

“शिवसेना ही मोठी संघटना, यात दोन गट मला नको,” दीपाली सय्यद यांची भावना

संबंधित व्हिडीओ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विजयी खासदारांसह उद्धव ठाकरेंनी अयोध्येत घेतले श्रीरामाचे दर्शन

Atul Chavan

भाजपने साध्वी प्रज्ञा यांची पक्षातून हकालपट्टी करून राजधर्म निभवावा !

News Desk

अमित शाह मुंबईत दाखल, सेना-भाजप युतीवर होणार शिक्कामोर्तब

News Desk