HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही !

वायनाड | “मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही.” असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आज (४ एप्रिल) केरळच्या वायनाड येथून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी आणि पूर्व उत्तर प्रदेशाचे महासचिव प्रियांका गांधी वॉड्रा यांनी रोड शोद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.


प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले की, “सीपीएममधील बंधू आणि भगिनी आता माझ्याविरोधात बोलण्यास प्रारंभ करतील, पण मी माझ्या संपूर्ण प्रचार मोहिमेत सीपीएमविरोधात एकही शब्द बोलणार नाही.” तसेच राहुल पुढे म्हणाले, देश एकसंध आहे, हे सांगण्यासाठी मी केरळमध्ये आलो आहे. उत्तर असू दे, दक्षिण असू दे, किंवा पूर्व किंवा पश्चिम असूदे माझा हाच संदेश देण्यासाठी आलो आहे की पंतप्रधान मोदी आणि आरएसएस दक्षिणेकडील संस्कृती आणि भाषेवर अत्याचार करत आहेत.


 

Related posts

दंगली व दहशतवादी हल्ले हे निवडणुका जिंकण्याचे साधन ठरू नये !

News Desk

मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही !

News Desk

काँग्रेसच्या सचिव पदी अभिनेत्री नगमा यांची वर्णी

अपर्णा गोतपागर