HW Marathi
राजकारण

मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, आम्ही मोदींच्या पाठीशी !

नवी दिल्ली | आगामी निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी सुचविले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहे. “मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सच्चा कार्यकर्ता आहे. केवळ देशाची सेवा करणे, देशासाठी काम करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. आम्ही नरेंद्र मोदींसोबत आहोत”, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत देखील भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास देखील नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. ‘माझे नाव पंतप्रधानपदासाठी सुचविले जाऊ शकते’ या चर्चा म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असेही नितीन गडकरी यांनी यावेळी म्हटले आहे. माझा आणि पंतप्रधानपदाचा काहीही संबंध नाही. मी संघाचा सच्चा कार्यकर्ता आहे. देशासाठी कामे करणे हेच आमचे प्रथम कर्तव्य आहे. मोदींच्या नेतृत्त्वात देश चांगली प्रगती करत आहे. आम्ही मोदींच्या पाठीशी आहोत. नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील, असा विश्वास देखील यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Related posts

टिपू सुलतानच्या जयंतीला कर्नाटकात विरोध, २ शहरात जमाव बंदी

News Desk

LIVE UPDATES | महागाई विरोधात कॉंग्रेसची भारत बंदची हाक, बंदला २१ पक्षांचा पाठिंबा

News Desk

ठाण्याच्या कचर्‍यावर पोसली जातेय शिवसेना !

News Desk