मुंबई | “लोकं मला सांगत आहेत कि माफी मागा. परंतु, मला असे वाटत नाही कि मी काही चुकीचं केलं आहे. यात काय चूक आहे ?”, असे म्हणत अभिनेता विवेक ओबेरॉयने माफी मागण्यास नकार दिला आहे. विवेक ओबेरॉय यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासंबंधी आक्षेपार्ह मजकुर असलेले मिम आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्यानंतर त्याला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. आक्षेपार्ह मजकूरासह अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांचा फोटो असलेले मिम पोस्ट केल्याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने विवेक ओबेरॉयला नोटीस बजावली आहे.
Vivek Oberoi: People are saying apologise, I have no problem in apologising, but tell me what wrong have I done? If I have done something wrong I will apologise. I don't think I have done anything wrong. What's wrong in it? Somebody tweeted a meme and I laughed at it. pic.twitter.com/d7z5362rwr
— ANI (@ANI) May 20, 2019
“लोकं म्हणत आहेत कि, माफी मागा. माफी मागण्यास मला काहीही हरकत नाही. पण मला सांगा मी काय चुकीचं केलं आहे ? जर मी काही चुकीचे केले असेल तर मी माफी मागेन. मला असे वाटत नाही कि मी काहीही चुकीचं केलं नाही. कोणीतरी ते मिम ट्विट केले होते, मी फक्त त्यावर हसलो”, असे विवेक ओबेरॉय याने म्हटले आहे.
Vivek Oberoi: I don't know why people are making a huge issue out of it. Someone had sent me a meme which made fun of me. I laughed on it&I appreciated the person for his creativity. If someone mocks at you, you should not take it seriously. pic.twitter.com/Ak23Slw8vr
— ANI (@ANI) May 20, 2019
“मला एक कळत नाही कि, लोकं यावरून इतका गदारोळ का करत आहेत ? कोणीतरी मला एक मिम पाठवले ज्यात माझ्यावर विनोद करून माझी खिल्ली उडविण्यात आली होती. मी त्यावर हसलो आणि त्याच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं. कोणी तुमची खिल्ली उडवत असेल तर ते इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही”, असे विवेक ओबेरॉय म्हणाला.
Vivek Oberoi: I don't know why people are making a huge issue out of it. Someone had sent me a meme which made fun of me. I laughed on it&I appreciated the person for his creativity. If someone mocks at you, you should not take it seriously. pic.twitter.com/Ak23Slw8vr
— ANI (@ANI) May 20, 2019
“ज्या ज्या व्यक्ती त्या मिममध्ये आहेत त्यांना याबाबत काहीही अडचण नाही. मात्र, काही नेते उगाच यावरून राजकारण करत आहेत. त्यांना माझा सिनेमा प्रदर्शित होण्यापासून रोखू शकले नाहीत. म्हणून, आता ते अशा पद्धतीने प्रयत्न करू पाहत आहेत”, असेही विवेक ओबेरॉय म्हणाला. दरम्यान, या प्रकरणी बॉलिवूडकडून देखील तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.