HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

माझे नरेंद्र मोदींवर प्रेम मात्र त्यांच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार !

पुणे । “माझे नरेंद्र मोदींवर प्रेम आहे, राग नाही. मात्र, त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही तिरस्कार आहे. अर्थात, त्याला माझी काहीही हरकत नाही”, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी भर संसदेत पंतप्रधान मोदींना मिठी मारली होती. आता पुन्हा राहुल यांनी अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. राहुल यांनी शुक्रवारी (५ मार्च) पुण्यातील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचप्रमाणे यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट असलेल्या मुद्द्यांवर देखील भाष्य केले.

एअर स्ट्राईकचे संपूर्ण श्रेय हे भारतीय हवाई दलाचे, वैमानिकांचे आहे. मात्र, पंतप्रधानांनी त्याचे राजकारण करणे हे दुर्दैवी असल्याचे देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी खुल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचे कारण काय ? प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा, आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याचा अधिकार आहे. त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागतील. आपल्याला सर्वच कळतं आणि आपल्याला सर्वच माहीत आहे, असा मोदींचा अ‍ॅटिट्यूड आहे”, असा टोला त्यांनी लगावला.

Related posts

#LokSabhaElections2019 : देशातील राजकारणाची घसरलेली पातळी

News Desk

अमित शहांच्या प्रकृतीत सुधार, एक-दोन दिवसांत मिळणार डिस्चार्ज !

News Desk

मी आता निवडणुक लढणार नाही। चंद्रकांत पाटील

News Desk