HW News Marathi
राजकारण

“आम्हाला बोलविताना त्यांना भाजपसोबत देखील चर्चा करावी लागेल,” दीपक केसरकरांचे खळबळजनक वक्तव्य

मुंबई | “आम्हाला बोलविताना त्यांना भाजपसोबत देखील चर्चा करावी लागेल,” असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. राज्यामध्ये शिंदे शिवसेनेपासून आपला वेगळा गट निर्माण केल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्याजवळीक असलेल्या अनेक लोकांवर वारंवार टीका होत आहे. तर उद्धव ठाकरेंनी बैठकींचा सपाटा लावला आहे. या बैठकीतून उद्धव ठाकरे वारंवार शिंदे गटावर टीका करत आहे. मुख्यमंत्र्यांनी आज (७ जुलै) मंत्रालयात अधिकृतरित्या पदाभार संभाळण्यासाठी आले होते.

उद्धव ठाकरेंनी बोलावले तर तुम्हची काय भूमिका असेल, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर केसरकर म्हणाले, “आम्ही आता सत्तेमध्ये भाजसोबत आहोत. आमचे एक नवीन कुटुंब तयार झाले असून आता आम्ही एकटे नाही, आमच्या कुटुंबात आता भाजप देखील आहे. आम्हाला बोलताना त्यांना भाजपला देखील बोलवावे लागेल,” असे ते म्हणाले. जे काही घडले त्यासाठी जबाबदार आहेत, त्या लोकांना पक्षातून काढू नका, परंतु, त्यांना थोडे तरी बाजूला ठेवा, असा सल्लाही केसरकरांनी ठाकरेंना दिला.

“अनेक लोक असे आहेत की, आम्ही कामे घेऊन उद्धव ठाकरेंकडे गेलो की, आमच्याकडे ही कामे द्या. आम्ही उद्धव ठाकरेंना सांगतो, असे बोलयाचे. यासाठी आम्ही आमदार झालेलो नाही. आमचे मुख्यमंत्री हे आमचे प्रतिनिधी असतात. आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या हातात अर्ज दिल्यानंतर आम्ही ही असे वाटते की आम्ही योग्य व्यक्तींच्या हाती अर्ज सोपविला आहे,” असे केसरकर म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उभ्या आयुष्यात इतका भित्रा, कमकुवत पंतप्रधान पाहिला नाही !

News Desk

#Elections2019 : तांत्रिक बिघाडाचा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम

News Desk

निवडणुकीत कॉंग्रेस करणार कडेकोट बंदोबस्त

News Desk