May 24, 2019
HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही !

नवी दिल्ली | “मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही. आमच्यासाठी गरिबांचे कल्याण आणि मातृभूमीचा सन्मान, रक्षण हे आमच्या जीवनापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज पाकिस्तानचा आणि दहशतवाद्यांची सर्व घमेंड उतरली आहे”, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. “मी कधीही गरिबांचे दुःख दूर करण्यासाठी काम करत आहे. मी कधीही गरिबांचे पैसे लुटण्याचे पाप केले नाही. गरिबीचे दुःख मी स्वतः सहन केले आहे. माझी केवळ एकच जात आहे ती म्हणजे गरिबी”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी काशी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी काशीमधील लोकांचे आभार मानले आहेत. “आज काशीतील प्रत्येक जण मोदी बनून ही निवडणूक लढवत आहे. जनसहभागातून काशी आज विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे. मी काशीसोबत जोडला गेलो आणि धन्य झालो. माझे जीवन काशीच्या कामी आले यामुळे मी अत्यंत संतुष्ट, समाधानी आहे”, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

“आज संपूर्ण जगात भारतामध्ये इंटरनेटचा सर्वाधिक वापर भारतात केला जातो. आधीचे सरकार 2 जी घोटाळा करण्यात व्यस्त होती. मात्र, आज देशातील गरिबांपर्यंत 4 जी इंटरनेट पोहोचले आहे”, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. “परावभवाच्या भीतीमुळे हे महामिलावटी लोक मला शिव्या देत आहेत. मात्र, त्यांनी दिलेल्या शिव्या या माझ्यासाठी आर्शीवादच बनल्या आहेत”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Related posts

लोकसभेसाठी सेना-भाजपची युती होणार ?

News Desk

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा | आरपीआय

News Desk

सेना- भाजप युतीचं सत्य काय ?

Atul Chavan