HW News Marathi
राजकारण

मी स्वतः ‘झेडपी’च्या शाळेत शिकलो, शरद पवारांकडून शालेय आठवणींना उजाळा

मुंबई | “मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आहे. पहिल्यापासूनच आमच्यावर शिक्षणाचे संस्कार झाले. आम्ही सातही भावंडं शिकलो. त्यावेळी, आमची आई आमच्यासाठी एसटीमधून डबा पाठवायची. आम्ही नीट शिकतो आहोत ना हे पाहण्यासाठी ती स्वतः जातीने यायची”, असे म्हणत राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शरद पवार हे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहातील प्रथम शिक्षण संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्याचप्रमाणे, यावेळी शरद पवारांनी आपली शिक्षण क्षेत्रासाठी काम करण्याची इच्छा उघड बोलून दाखवली. “आम्ही कोणत्याही क्षेत्रात काम केलं तरीही शिक्षण क्षेत्रासाठी काम केलं पाहिजे, हे आमच्या कायम मनात असतं”, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

”माझं स्वतःचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्याआधी आमच्या घरात कोणी विशेष शिकलेलं नव्हतं. पण माझ्या आईला शिक्षणाबाबत खूप ओढ आणि आस्था होती. आमच्यावर पहिल्यापासूनच हे शिक्षणाचे संस्कार झाले. आमच्या पिढीला शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन मिळालं. आम्ही सातही भावंडं शिकलो. आम्ही शाळेत असताना आमची आई आमच्यासाठी एसटीमधून डबा पाठवायची. आम्ही नीट शिकतो आहोत ना हे बघण्यासाठी ती स्वतः जातीने यायची. शिक्षणाच्या कामात मोठे समाधान मिळते. त्यामुळे, आम्ही आता कुठल्याही क्षेत्रात काम केलं तरीही शिक्षण क्षेत्रासाठी काम करण्याची इच्छा कायम आमच्या मनात असते”, असे म्हणत यावेळी शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे.पी.नाईक आणि चित्रा नाईक यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दलही शरद पवार भरभरून बोलले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तेलंगणात निकालापूर्वीच सत्ता स्थापनेची तयारी

News Desk

पश्चिम बंगालमध्ये भाजपला विजयी रॅली काढू देणार नाही !

News Desk

जेडीएसच्या आमदारांना भाजपकडून १०० कोटीची ऑफर | कुमारस्वामी 

News Desk