HW News Marathi
राजकारण

…तरीही मला पक्षात मान-सन्मान मिळतो आहेच !

मुंबई | “आज माझ्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही पद नाही. तरीही, मला पक्षात मान-सन्मान मिळतो आहेच. त्यात कधीही कमतरता भासली नाही”, असे विधान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. त्याचप्रमाणे “कार्यकर्त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाजाचे प्रश्‍न, अडचणी सोडविण्यासाठी सतत काम करत राहायला हवे”, असेही भुजबळ यावेळी म्हणाले.

“आपल्याला बढती मिळाल्यानंतर त्या पदाधिकाऱ्याने आपले जुने पद सोडून दुसऱ्याला द्यायला हवे. आज माझ्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेही पद नाही. प्रदेश अध्यक्ष, विरोधी पक्षनेता किंवा अन्य कोणतेही पद नाही. परंतु, त्याने काय फरक पडतो ? मला पक्षात मान, सन्मान मिळतोच. म्हणून आपण पदापेक्षा समाजाच्या अडचणी, समस्यांकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी झोकून काम केले पाहिजे”, असे भुजबळ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपण संघाच्या चांगल्या गोष्टी आत्मसात करायला हव्यात !

News Desk

“…तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

#LokSabhaElections2019 : भाजपची चौथी यादी जाहीर, ६ राज्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा

News Desk