नवी दिल्ली | भारतात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम हॅकिंग केल्याचा दावा लंडनमधील हॅकेथॉनमध्ये केल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. सय्यद शुजा यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांची उपस्थितीवरून भाजपने असलेल्या काँग्रेस प्रायोजित होती, असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे.
भाजपच्या या अरोपावर कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. सिब्बल म्हणाले की, ‘‘मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो. यावेळी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन लंडनचे अध्यक्ष आशीष रे यांनी मला या पत्रकार परिषदेस येण्यासाठी इमेल करुन निमंत्रण दिले होते. त्यामुळे मी या पत्रकार परिषदेस गेला होतो.’’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. तसेच ‘‘या प्रकरणाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही. शिवाय भाजपसह सर्व राजकीय पक्ष आणि निवडणूक आयोगालाही या कार्यक्रमाबाबत निमंत्रण पाठविले होते, असे आशिष रे यांनी मला सांगितले होते.’’ असा खुलासाही सिब्बल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Kapil Sibal, Congress: He (Ashish Ray) sent me a personal e-mail also. I told him that I will be in London for some personal work & he insisted that I should come as they are going to make an important revelation. So I went https://t.co/P3doD1og4S
— ANI (@ANI) January 22, 2019
सोमवारी (२१ जानेवारी) लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत २०१४ साली भाजपने ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्या होत्या, असा दावा या हॅकरने केला आहे. त्यावर भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. लंडनमध्ये काँग्रेसचे कपिल सिब्बल काय करत होते? ते काँग्रेसच्या वतीने तेथे देखरेख ठेवते होते का? देशातील २०१४ मधील जनतेचा अपमान करण्यासाठी काँग्रेसने हा इव्हेंट पुरस्कृत केला होता की काय? असे प्रश्न केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी उपस्थित केले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.