मुंबई | टॉलिवूडसह बॉलिवूडमध्ये ही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता प्रकाश राज आता राजकारणामध्ये एंट्री करणार असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. परंतु प्रकाश राज कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
HAPPY NEW YEAR TO EVERYONE..a new beginning .. more responsibility.. with UR support I will be contesting in the coming parliament elections as an INDEPENDENT CANDIDATE. Details of the constituency soon. Ab ki baar Janatha ki SARKAR #citizensvoice #justasking in parliament too..
— Prakash Raj (@prakashraaj) December 31, 2018
प्रकाश राज यांनी ट्विट करत सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छांसोबत ‘तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहे. मतदारसंघाबाबतची माहिती लवकरच देईन. अबकी बार जनता की सरकार!’ अशी घोषणादेखील दिली आहे. प्रकाश राज यांनी नेहमीच
प्रकाश राज यांनी अनेकदा सोशल मीडियावरुन भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला आहे. “मैने मांगा राशन, उसने दिया भाषण.” या मिमच्या माध्यमातून प्रकाश राज यांनी मोदींच्या भाषणांवर टीका केली होती. मोदी खोटे बोलतात, मीडिया खोट्या बातम्या पसरवते, मोदींच्या पक्षाचे प्रवक्ते खोट्या गोष्टींवर स्पष्टीकरण देत बसतात, त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते मात्र या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात, असेही ते म्हणाले होते. त्यामुळे ते भाजप आणि मोदींचे कठोर विरोधक म्हणून ओळखले जातात.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.