HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही !

मुंबई | “मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही. मी राष्ट्रवादी आहे हे सर्वजण जाणतात. आम्ही गेल्या निवडणुकांमध्ये अनेक आश्वासने दिली. मात्र आम्ही सत्तेत असताना काय केले हे सांगण्याची वेळ आता आली आहे”, असे विधान केंद्रीय मंत्री आणि आगामी निवडणुकांसाठी नागपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केले आहे. आगामी निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांकडून विशेषतः धर्माच्याआधारावर राजकारण केले जात असताना नितीन गडकरी यांचे हे विधान महत्त्वाचे ठरते.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजकपडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून नाना पटोले यांच्यात लढत होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी नागपूरमधून काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार
विलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. “मी माझ्या विकासकामांच्या आधारवरच निवडणूक लढविणार आहे. मी जे बोलतो ते मी करुन दाखवतो. मी नागपूरातील रस्ते, मेट्रोसारख्या कामांना चालना देण्याचे काम केले आहे. मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही”, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला!

News Desk

आमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही !

News Desk

दिग्विजय यांचे मोदींना आव्हान, हिंमत असेल तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

News Desk