HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, ‘इंदूर’चा निर्णय पक्ष घेईल !

नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शुक्रवारी (५ मार्च) आगामी लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. ”मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. इंदूर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत पक्ष योग्य तो निर्णय घेईल”, असे सुमित्रा महाजन स्पष्ट केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंदूर मतदारसंघावरून अनेक चर्चा सुरु होत्या. सुमित्रा महाजन या इंदूरमधून तब्बल सलग ८ वेळा निवडून आल्या आहेत. त्यामुळे सुमित्रा महाजन यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाणार कि अन्य भाजपतील ज्येष्ठ नेत्यांप्रमाणे त्यांनाही उमेदवारी नाकारली जाणार याबाबत संभ्रम होता. मात्र, आता सुमित्रा महाजन यांनी स्वतःहून माघार घेतली आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांसारख्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना भाजपने उमेदवारी नाकारली. त्याचप्रमाणे त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून देखील बाद केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी देणे हेतुपूर्वक टाळले आहे. त्यामुळे ८० वर्षीय सुमित्रा महाजन यांच्याही उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. इंदूरमध्ये सुमित्रा महाजन यांची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यामुळे पक्ष त्यांना उमेदवारी नाकारणार कि नाही ?, याबाबत चर्चा होत होत्या.

Related posts

पांढरकवडात पंतप्रधान मोदींविरोधात “मोदी गो बॅक”चे पोस्टर

News Desk

आंबेडकरांचा गेम प्लॅन नेमका काय हे आम्हाला कळत नाही ! 

News Desk

पर्यावरण दिनी राजकीय प्रदूषण नको | अदित्य ठाकरे

धनंजय दळवी