HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट

मुंबई | गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी आज (११ एप्रिल) आयडी स्फोट घडवून आणला आहे. देशभरात आजपासून लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूर मतदारसंघ देखील येतो. एटापल्ली मतदान केंद्रावर मतदानादरम्यान नक्षलवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे.

देशभरात आज लोकसभा निवडणुकांसाठीचा पहिला टप्पा पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम या ७ मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी गडचिरोली येथे मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला आहे.

Related posts

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक

News Desk

ठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा

News Desk

दिल्लीत पवार-राहुल गांधींची बैठक सुरु, राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन ?

News Desk