नवी दिल्ली | “विरोधक आरोप करतात की भारत देश हरला, लोकशाही हरली. मग वायनाड आणि रायबरेलीमध्ये देश हरला का ? अमेठीमध्ये देश हरला का ? काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे ? असे म्हणणे म्हणजे लोकशाहीचा आणि जनतेचा मोठा अपमान आहे. काँग्रेस म्हणजे देश नाही”, अशी संतप्त प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनादरम्यान पंतप्रधान मोदी बोलत होते.
PM Modi: Did India lose in Wayanad? Did India lose in Rae Bareli? Did India lose in Trivandrum, what about Amethi? What kind of argument is this? If Congress loses then does that mean India lost? There is a limit to arrogance. Congress could not win a single seat in 17 states pic.twitter.com/XjCkebaLlx
— ANI (@ANI) June 26, 2019
“काँग्रेस म्हणजे काही देश नाही. ६० वर्ष देश चालविणारा पक्ष १७ राज्यात एकही जागा जिंकू शकत नाही ते बोलतात देश हरला. असे विधान करुन ते देशातील मतदारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहेत. अशा पद्धतीने देशातील लोकशाहीचा आणि मतदारांचा अपमान होणे चुकीचे आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. निवडणुकीला एक विशेष महत्त्व असते. निवडणुकीत पराभव झाला म्हणून देश निवडणूक हरला असे म्हणणे म्हणजे लोकशाही आणि लोकांचा अपमान आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.