HW News Marathi
राजकारण

दंगलीबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना कळवा !

मुंबई | दंगलीबाबत काही माहिती असेल तर पोलिसांना कळवा, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात पुन्हा दंगल घडविण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे, असा धक्कादायक दावा सोमवारी (३ डिसेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे विक्रोळी येथील एका कार्यक्रमात बोलत होते.

आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मोठ्या दंगली घडविण्याचे कारस्थान रचण्यात येत आहे. ओवैसी बंधूंच्या मदतीने देशात दंगली घडविण्याचा कट आखला जात असल्याचा राज यांनी म्हटले आहे. राज यांनी यावेळी त्यांना दिल्लीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीच्या कॉलचा दाखला दिला. दरम्यान, राज ठाकरे यांच्या या दाव्याची संजय राऊत यांच्याकडून खिल्ली उडविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण, विरोधकांनी ‘डार्क डे’ म्हणून केला निषेध

News Desk

Loksabha Election 2019 | तारखा जाहीर होण्यापूर्वीच प्रचारसभांची तयारी

News Desk

“कागदावर शिंदे गटाला नाव आणि चिन्ह मिळाले, पण…”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna