नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच जम्मू-काश्मीरमधील लेह दौऱ्यावर आले आहेत. नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (२ फेब्रुवारी) लेहमधील नव्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे भूमिपूजन करण्यात आले आहे. “आज मी टर्मिनल बिल्डिंगचे भूमीपूजन केले आहे. तुमचा आशीर्वाद मिळाला तर टर्मिनल बिल्डिंगचे लोकार्पणसुद्धा मीच करेन”, असे मोदी यावेळी म्हणाले.
PM Modi in Leh: Once Bilaspur-Manali-Leh rail line is completed, the distance from Delhi to Leh will be reduced. It will also benefit the tourism sector. Protected Area Permit's validity has been increased to 15 days, now tourists will be able to enjoy their journey to Leh. #J&K pic.twitter.com/TWvtZMQIVP
— ANI (@ANI) February 3, 2019
“तीन दशकांपूर्वी जेव्हा या विमानतळाची टर्मिनल बिल्डिंग बनविण्यात आली होती तेव्हा त्याच्या अत्याधुनिकतेकडे लक्ष देण्यात आले नव्हते. मात्र, आज ज्या नव्या टर्मिनल बिल्डिंगचे भूमीपूजन झाले ते अत्याधुनिक असेल. आज मी या टर्मिनल बिल्डिंगचे भूमिपूजन केले आहे. तुमचा आशीर्वाद मिळाला याचे लोकार्पणसुद्धा मीच करेन”, असे म्हणत अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींनी लोकांना आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला साथ देण्याचे आवाहन केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.