HW News Marathi
राजकारण

राहुल गांधी म्हणाले तर वाराणसीमधून निवडणूक लढवेन ! 

नवी दिल्ली । यंदाच्या लोकसभेसाठी काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे नाव काँग्रेसच्या वाराणसी मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून अनेकदा चर्चेत येत आहे. वाराणसी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नेते प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत आग्रही आहेत, असे बोलले जाते. मात्र वाराणसी मतदारसंघातील उमेदवारीबाबत स्वतः प्रियंका गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर मला वाराणसीतून निवडणूक लढवण्याचे आदेश दिले तर मी तयार आहे”, असे वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केले आहे. त्या वायनाड दौऱ्यावर आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. प्रियंका गांधी यांनी जम्मू -काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान व्ही.व्ही वसंत कुमार यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वाराणसीमधून निवडणूक लढविण्याबाबत तयारी दर्शविली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औवेसींवर ‘या’ कारणामुळे संसदेत अमित शहा भडकले

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

News Desk

#LokSabhaElections2019 : गोवा काँग्रेसकडून राज्यात सत्ता स्थापनेचा दावा

News Desk