HW News Marathi
मुंबई

भिवंडीतील इमारतीला भीषण आग

मुंबई | भिवंडीतील काल्हेर येथील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना आज (२२ एप्रिल) सकाळी घडली आहे. अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. काल्हेर येथील जय मातादी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीत ही आग लागली आहे. आगीत या कंपनीसह ५ गोदामे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अद्याप ही आग लागण्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. जय मातादी कंपाऊंडच्या ब्रश कंपनीत असलेल्या ऑईल पेंट आणि ब्रशच्या मोठ्या साठ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अवघड होत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Independence Day | स्वातंत्र दिनानिमित्त मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई

News Desk

मुंबईतील गारवा होणार १५ दिवसांसाठी गायब 

News Desk

पादचारी पूल हटविताना क्रेन उलटली

News Desk