मुंबई | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांची आमदारांकी वाचवायची असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन करण्यापासून दुसरा पर्यात नाही. आणि शिवसेना प्रमुक बाळासाहेब ठाकरे शिवसेना असा वेगळा गट स्थापन करता येणार नाही, अशी माहिती शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी माध्यमांना दिली. शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षासोबत बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळले आहे. या बंडखोरी शिंदे गटामधील 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसच्या आधारे आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही, असा दावा बंडखोर केलेल्या गटाने केला आहे. शिवसेनेने कायदेशीर सल्ला समोर ठेवला आहे. हे सर्व प्रकरणी शिवसेनेची कायदेशी बाजु सांभळणारे कामत यांनी आज (26 जून) संवाद साधला
देवदत्त कामत म्हणाले, “जर एखाद्या सदस्याने स्वत: हून पक्षाचा राजीनामा दिला तर ते अपात्र ठरू शकतात. तसेत विधीमंडळाच्या सभागृहाच्या बाहेरची एखाद्या सदस्याची कृती पक्षाविरोधात ठरली, असेल तर ते सदस्य अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते.” काम पुढे म्हटले की, पक्षाने बोलविलेल्या बैठकीत बंडखोरी आमदार अनुपस्थित राहिले.नाही. त्या व्यतिरिक्त हे सर्व बंडखोर आमदारांनी दुसऱ्या राज्यात जाने आणि सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणे यासंदर्भात कायद्याच्या परिच्छेद 2 अ चे उल्लंघन केले आहे, अशी माहिती कामत यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे.
The concept of 2-3rd (to surpass anti-defection law) apply only if there is a merger. Until the MLAs don’t merge with another party, disqualification applies. Till today there’s no merger, they have voluntarily given up membership: Adv Devdutta Kamat, Shiv Sena’s Senior Counsel pic.twitter.com/lGRlhFazDq
— ANI (@ANI) June 26, 2022
बंडखोरांनी दोन तृतितांश सदस्यांचा गट वेगळा झाला असून तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही, असे शिंदे गटानी म्हटल्यावर सेनेचे वकील म्हणाले, “पक्षापासून वेगळा झालेला गट एखाद्या पक्षात विलीन होतो. तेव्हा हा नियम लागू होतो. पक्षापासून वेगळा झालेल्या गटाचे कोणत्याही विलिनीकरण झाल्याचे अद्याप समजले नाही. परंतु, या आमदारांवर अपात्रेची याचिका दाखल करण्यात आलेली नाही. घटनेत 2003 पूर्वी आमदारांना वेगळे होण्यासाठी दोन तृतियांश सदस्यसंख्येचा नियम होता. यानंतर विलिनीकरणाची अट समाविष्ट करण्यात आली आहे.”
संबंधित बातम्या
एका बापाचे असाल तर आमदारकीचा राजीनामा द्यावा! – संजय राऊत
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.