नवी दिल्ली | साध्वी प्रज्ञा सिंह यांनी बुधवारी (१७ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने लगेचच त्यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील जाहीर केली. दरम्यान, साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी निश्चित झाल्याने काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुला यांनी संताप व्यक्त केला आहे. “साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत आता ठीक असेल तर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवा. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या दहशतवादाच्या आरोपी आहेत. न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द करावा”, अशी मागणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केली आहे.
Omar Abdullah on Sadhvi Pragya Singh Thakur: BJP have given ticket (from Bhopal) to a candidate who is not only an accused in a terror case but is also out on bail on health grounds. If her health condition doesn't permit her to be in jail,how does it permit her to contest polls? pic.twitter.com/2yfdZQYOch
— ANI (@ANI) April 18, 2019
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भोपाळ भाजपच्या कार्यालयात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह अन्य भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर थोड्याच वेळात भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह यांना भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाली. “मी निवडणूक लढवेन आणि जिंकेनसुद्धा”, असा विश्वास देखील”, साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केला आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची तब्येत आता ठीक असेल तर त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवा. भाजपने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. यापेक्षा भाजपचे मोठे दुर्दैव काय असू शकते ?”, असे ओमर अब्दुला यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.