HW News Marathi
राजकारण

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू | महादेव जानकर

माणखटाव | महाराष्ट्र लोकसभा निवडणुका संपल्या असून सध्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळजण परिस्थिती पाहायला मिळत आहे. दुष्काळाचे रौद्र रुप पाहाता निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील आचारसंहिता शिथील केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील माणखटाव तालुक्यात एच. डब्ल्यू मराठीने दुष्काळाची भीषणता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री व रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याशी बातचीत केली असताना त्यांनी राज्य सरकार दुष्काळाचे निवारण करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.याचवेळी जानकरांनी विधानसभा निवडणुकीत रासपला जास्त जागा मिळणार असल्याचे सांगितले.

शेतकरी आणि जनावरांसाठी तिजोरी रिकामी करणार

माणखटावाची जनता ही सकारात्मक आहे. केंद्रात आणि राज्यात आमच्या हातात सत्ता आहे. राज्य सरकार आता फक्त पिण्यासाठीच नाही तर शेतीसाठी देखील पाण्याची सोय करण्याचाआम्ही प्रयत्न करत आहोत. चारा छावण्यासाठी शेतकऱ्याचे मत जाणून घेवून त्यानुसार आम्ही जिआर बदला आहे. यापूर्वी एका गायीला १५ किलो चारा देण्यात येत होता, आता याचे प्रमाण वाढवून आता १८ किलो करण्यात आले आहे. तर चारा छावणीतील जवानरांची मर्यादा ५ पासून १५ पर्यंत करण्यात आली आहे. शेतकरी त्यांचे जनावरे आणि शेतीसाठी सरकार आपली तिजोरी रिकामी करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असे जानकरांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट मत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागाची पाहणी करण्यास सांगितले आहे.

वेळ पडली तर रेल्वेने पाणी आणू

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आमच्या सरकारने सोय केली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे पैशाची मागणी केली होती. आणि केंद्रच्या बजेटमध्ये पैशाची मदत मागितली होती. केंद्राने दुष्काळासाठी ७ हजार २० कोटी रुपये दिले आहे. परंतु केंद्र सरकारच्या मदत येण्यापूर्वीच राज्य सरकारने १२ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. अजून देखील राज्याच्या तिजोरीत पैसे शिल्लक आहेत. राज्याच्या तिजोरी रिकामी झाल्याच्या बातम्या खोट्या आहेत. वेळ कमी पडली तर आम्ही पाणी रेल्वेच्या बोगिने आणण्याचा प्रयत्न करू, पालघर आणि रत्नागिरीला चारा आणूण ठेवला आहे. वेळ कमी पडली तर रेल्वेने आणायला वेळ लागणार नाही. कोरगावमधून उतरणू ट्रकने महाराष्ट्रातील १५१ दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जनावंरांना पुरविण्यात येईल. असा विश्वास जानकर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला आहे.

एक पाऊल आपण देखील मागे सरकले पाहिजे

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी माझ्या तिकीटावर निवडणूक लढलो होतो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा त्यांनी माझे ऐकले. तर मी त्यांचा धाकटा भाऊ म्हणून त्यांचे ऐकले पाहिजेल ना. विधानसभेला रासपाला जागा वाढून मिळणार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिल्यामुळे माझा राग शांत झाला आहे. मी भाजप-शिवसेना यांच्या युतीसोबत राहणार आहे. राजू शेट्टी माझा चांगला मित्र असून मी आजही त्याला उचलून माझ्यासोबत आणू शकतो हा विश्वास जानकरांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

 

 

Related posts

अयोध्या वारीसाठी सेनेला मनसे शुभेच्छा !

News Desk

२०१४ सारखी लाट निर्माण करणे सध्या कठीण | प्रशांत किशोर

News Desk

लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले, आजपासून देशभरात आचारसंहिता लागू

News Desk