HW Marathi
राजकारण

युती झाली तर आम्ही किरीट सोमय्यांसाठी प्रचार करणार नाही !

मुंबई | “युती झाली तर ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्या नको”, अशी मागणी शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. किरीट सोमय्या यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. म्हणून शिवसैनिकांचा किरीट सोमय्यांवर प्रचंड राग असल्यानेच त्यांनी ही भूमिका घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, “किरीट सोमय्यांना उमेदवारी दिली तर शिवसैनिक त्यांच्यासाठी प्रचार करणार नाहीत. तसेच एकही शिवसैनिक सोमय्यांना मत देणार नाही”, असे शिवसैनिकांकडून पक्षप्रमुखांना सांगण्यात आले आहे.

“मुंबई महापालिकेत माफिया राज असून वांद्र्यातील माफिया याला जबाबदार आहे. भाजप ते उलथवून लावेल”, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले होते. भाजप-सेना युती होणार की नाही, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत काहीतरी धुसफुस सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर केल्या जाणाऱ्या जहरी टीकांमुळे या दोन्ही पक्षांमधली कटुता आणखी वाढली आहे.

Related posts

मुंबईत शिवसेनेला जोरदार झटका शिवसेनेचे वाघ मनसे मध्ये

News Desk

#LokSabhaElections2019 : पहिल्यांदाच सोशल मीडियावर आचारसंहिता लागू

News Desk

नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ आगामी लोकसभा निवडणूक लढविणार

News Desk