HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक लढवून दाखवा, पंकजा मुंडेंचे आव्हान

मुंबई | “राज्याचे नेतृत्व करतो असे म्हणणारे पाठच्या दाराने येतात. स्वत: तर निवडणूक लढवत नाहीत, केवळ इतरांना पुढे करतात. तुमच्यात हिंमत असेल तर लोकसभा निवडणूक लढवून दाखवा”, असे आव्हान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना दिले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीकेची झोड उठविली जात आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील वाद सर्वांसमोर आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.

“मी वडिलांचा गड बांधला, त्यांनी चौथरा तरी बांधला का ? असा सवाल देखील पंकजा यांनी यांनी यावेळी केला आहे. “स्वत: निवडणूक न लढवता केवळ इतरांना पुढे करता. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही निवडणुकांच्या मैदानात उतरा. मग जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते ते बघा”, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत. त्या बीडमधील प्रचारसभेत बोलत होत्या.

काहीच दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंवर निशाणा साधला होता. “पोटी जन्म घेतला म्हणजे राजकीय प्रश्न कळतीलच असे नाही”, असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना लगावला होता. “एका कुटुंबाला बीडच्या जनतेने खूप प्रेम दिले. मात्र बीडच्या जनतेला त्यातून काय मिळाले ? गेल्या ५ वर्षांमध्ये कधीही न दिसलेल्या खासदार निधी देखील खर्च करू शकल्या नाहीत. मग त्या दबंग कशा ?”, असे सवालही धनंजय मुंडे यांनी केला होता.

Related posts

काँग्रेस-टीडीपी खिसेकापणाऱ्या जमातीचा पक्ष !

News Desk

नरभक्षक वााघाची शिकार करावी लागते, आयुक्तांना आनंद परांजपे यांचा टोला 

News Desk

मुंबई उच्च न्यायालयातून धनगर आरक्षणाची कागदपत्रे गायब

News Desk