HW News Marathi
राजकारण

प्रकाश आंबेडकरांचा महत्वपूर्ण निर्णय

पुणे | भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 2019 च्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीसाठी वंचित बहुजनांची आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्यात येणार आहेत. पुण्यात बुधवारी विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीला लक्ष्मण माने, हरिभाऊ बधे, विजय मोरे यांच्यासह विविध संघटनांचे उपस्थित होते.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे लोकशाही सर्व स्तरापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रभर दौरा केला जाणार आहे अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली. तसंच राज्यात चार ते पाच ठिकाणी परिषदा घेण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या निर्णयामुळे भाजप विरोधी महाआघाडी बनविण्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. आगामी काळात या आघाडीत कोण कोण सहभागी असणार आहे हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांची खासदार, आमदारांसह नगरसेवकांची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक

News Desk

‘भारतरत्न’ पुरस्कारावर राजकारण ?

News Desk

कॉग्रेसच देशाचा विकास करू शकते | राहुल गांधी

News Desk
राजकारण

सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचा समाचार

News Desk

मुंबई | आज (मंगळवारी) शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असून १९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती .आज शिवसेनेला ५२ वर्ष पुर्ण झाली आहेत त्यानिमित्त ‘सामना’च्या अग्रलेखातून 2014 चा राजकीय अपघात 2019 मध्ये होणार नाही असे म्हणत शिवसेनेने भाजपा वर निशाना साधला आहे. तर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचीच सत्ता येईल असे म्हणत पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

केंद्रात सत्तेवर कोण येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद शिवसेना राष्ट्रीय पातळीवर निर्माण करेल असा विश्वासही अग्रलेखातून व्यक्त केला आहे. दिल्लीतील आपचे आंदोलन, जवानांची हत्या, लोकशाहीच्या मुद्द्यावरून भाजपा व पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून तोफ डागण्यात आली आहे. देशात आज ‘आणीबाणी’पूर्व परिस्थिती आहे काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत तर सत्तेचा माज आम्हाला कधी चढला नाही आणि पुढेही आम्ही तो चढू देणार नाही.काश्मीरात जवानांच्या हत्या होतच आहेत. लोकांनी बहुमताने निवडून दिलेल्या सरकारचा गळा राजधानी दिल्लीतच आवळला जात आहे.

नोकरशाहीचा हम करे सो कायदा सुरूच राहिला तर निवडणुका लढणे व राज्य चालविणे मुश्कील होईल’, अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे . उत्तर भारतात ऊठलेल्या धुळीचा काणोसा घेत ‘धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत . मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्य़ात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. असा टोमना वजा सूचक इशारा भाजपला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Related posts

‘ते’ राष्ट्रपिता होते, पण पाकिस्तानचे !

News Desk

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

Aprna

“सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असणार”, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Aprna