Site icon HW News Marathi

‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळाव्याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज होणार सुनावणी

मुंबई | शिवसेना दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) वाद आता मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) पोहचला आहे. या याचिकेवर न्यायालयात आज (22 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. पालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारल्यामुळे न्यायालया यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे.

पालिकेने कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत ही परवानगी नाकारल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. पालिकेने पोलिसांच्या अभिप्रायाच्या आधारे दोन्ही गटांना मेळाव्याची परवानगी नाकारली असल्याचे पत्रातून सांगितले आहे. पालिकेने परवानगी नाकारताना म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात (शिवाजी पार्क) दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी दोन्ही बाजूने अर्ज केले होते. परंतु, मेळाव्यासाठी एका अर्जदाराला परवानगी दिली तर शिवाजी पार्कच्या संवेदनशील परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो,” असे स्पष्टीकरण पालिकेने परवानगी नाकारण्यावरून दिले आहे.

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

दरम्यान,  “दसरा मेळावा (Dussehra Melava) हा आपल्या परंपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार आहे,” असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर काल (21 सप्टेंबर) पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी गोरेगावमधील नेस्को मैदानात शिवसेना गटप्रमुखांच्या मेळावा घेतला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरी उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर तोफ डागली.

 

संबंधित बातम्या

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! – उद्धव ठाकरे

दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावर शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी

Exit mobile version