HW Marathi
राजकारण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला जलील अनुपस्थित

औरंगाबाद | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने औरंगाबादमध्ये सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (१७ सप्टेंबर) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्ताने ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे. यावेळी  एआयएमआयएमचे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी अनुपस्थित होते. जलील औरंगाबादचे खासदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला गैरहजरीने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

यापूर्वी जलील यांनी आमदार असतांना पाच वर्षातील एकाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला ते उपस्थित राहीले नव्हते आणि आता खासदार झाल्यावरही त्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली आहे  त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.जलील आज मुंबईत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका आणि  इच्छूकांच्या मुलाखती सुरू आहेत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानूसार मी आज रात्रीच मुंबईला जाणार आहे.

तसेच सोशल मिडीयावर ट्रोल झाल्यानंतर ‘माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरुन कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करु नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता दिसून येते. देशभक्तीचे प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही, अशा शब्दा जलील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्याला फेसबुक अकांऊटवर पोस्ट लिहून त्यांच्यावर निशाणा साधला

 

 

 

Related posts

राज्यातील दुष्काळाबाबत चर्चेसाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk

भाजपला बारामतीत विजय मिळाल्यास मी राजकारणातून निवृत्ती घेईन !

News Desk

शरद पवार देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यास तयार !

News Desk