HW News Marathi
राजकारण

दीड महिन्यापूर्वी आम्ही सुद्धा सर्वात मोठी हंडी फोडली! – मुख्यमंत्री

मुंबई। “दीड महिन्याभरात पूर्वी आम्ही सुद्धा सर्वात मोठी हंडी फोडली”, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला. मुख्यमंत्र्यांनी आज (१९ ऑगस्ट) ठाण्यात टेंभी नाका येथे दहीहंडी उत्सव हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हजारो गोविंद पथकांसमोर जोरदार फटके बाजी केली. या कार्यक्रमाला श्रद्धा कपूर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, “दीड महिन्याभरात पूर्वी आम्ही सुद्धा सर्वात मोठी हंडी फोडली. ती हांडी फोडणे तसे फारच कठीण काम होते. ती हांडी खूप उंच पण होती. परंतु, तुमच्या आशीर्वादाने आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले. आम्ही लावले थर आणखी वाढत जातील”, असे ते यावेळी ते म्हणाले.
“धर्म आणि संस्कृती जोपासण्यासाठी आनंद दिघेंनी काम केले. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, अशी आनंद दिघे यांचे स्वप्न होते. ही आनंद दिघेंची दूरदृष्टी होती, आणि आज ते स्वप्न पूर्ण केले आहे. दिघेंच्या आशिर्वादाने मला मुख्यमंत्री म्हणून दहीहंडीला उपस्थित राहता आले. अजून कोरोना गेलेला नाही. त्यामुळे काळजी घ्या”, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पार्थ पवार, रोहित पवार आगामी निवडणूक लढविणार नाहीत !

News Desk

सुंदर चेहऱ्यांमुळे मते मिळत नाहीत !

News Desk

#LokSabhaElections2019 :भाजपच्या पहिल्या यादीत मोदी, गडकरींसह सुजय विखे-पाटील यांना स्थान मिळणार ?

News Desk