HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्र क्रांती सेनेचा भाजप-सेना युतीला पाठिंबा

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती सेनेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेने यंदाच्या निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेच्या महायुतीला पाठिंबा दिला आहे. रविवारी (७ मार्च) महाराष्ट्र क्रांती सेनेकडून याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते देखील उपस्थित होते. ज्या ज्या मतदारसंघांसाठी महाराष्ट्र क्रांती सेनेने आपले उमेदवार उभे केले आहेत तिथून त्यांचे अर्ज मागे घेऊन आम्ही शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा देऊ असे महाराष्ट्र क्रांती सेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना ही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यात आल्याने आता त्यांचा सरकारवर रोष नाही. यापूर्वी महाराष्ट्र क्रांती सेनेने महाराष्ट्रातील १५ लोकसभा मतदारसंघांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. मात्र, मराठा आरक्षणाला न्यायालयाकडून स्थगिती न मिळाल्याने आपण महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts

शरद पवारांनी बोलावली बैठक

News Desk

अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची सांत्वनपर मदत द्या !

News Desk

पुलवामा हल्ल्याबाबत यादव यांचे वक्तव्य हे गलिच्छ राजकारणाचे उदाहरण !

News Desk