HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी | नरेंद्र मोदी

वर्धा | महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लबोल केला आहे. मोदी पुढे असे देखील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशातील वारे कुठे वाहतेय हे त्यांनी ओळखले. त्यामुळे पवारांनी निवडणूक लडढण्याआधीच मैदान सोडले असल्याचे सांगत मोदींनी पवारांवर टीकास्त्र सोडले.

विसरु नका, जेव्हा मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी लढत होते. तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळी झाडण्याचा आदेश दिला होते. शरद पवार स्वत: शेतकरी असूनही शेतकऱ्यांना विसरले, त्यांच्या अडचणी विसरले. त्यांच्या कार्यकाळात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पण पवार साहेबांनी कशाचीच पर्वा केली नाही. मोदींनी शरद पवार सत्तेत असताना त्यांनी मावळ शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारीची पुन्हा एकदा आठवण करत पवारांवर हल्लाबोल केला आहे.

तसेच जेव्हा महाराष्ट्रातील शेतकरी अजित पवार यांना धरणातील पाण्यासंदर्भात प्रश्न विचारायला गेले असता, त्यांना काय उत्तर दिले. असे उत्तर दिले की, जे मी बोलू शकतही नाही, असे बोलून मोदींनी त्यांच्या भाषणात अजित पवार यांच्या वादग्रस्त विधानाचाही आठवण करत त्यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ एप्रिल) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मोदींची ही पहिली प्रचार सभा पार पडली.

मोदीच्या भाषणाती महत्त्वाचे मुद्दे

 • काँग्रेसकडून काम आणि श्रमाचा अपमान झाला
 • तुमच्यासाठी शौचालय हा मस्करीचा विषय असेल, माझ्यासाठी सन्मानाचा आहे
 • जेव्हा मी शौचालयाचा चौकीदार बनतो, तेव्हा कोट्यवधी माता-भगिनींच्या अब्रुचीही चौकीदारी करतो.
 • शौचालयाचा चौकीदार ही तुमची शिवी माझ्यासाठी दागिना, मी त्याचा अभिमानाने स्वीकार करतो
 • राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली
 • महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी  कुंभकर्णारखी आहे
 • देशातील वारे कुठे वाहतात, हे पवारांनी ओळखले
 • राष्ट्रवादीत शरद पवारांचे वर्चस्व कमी झाले असून अजित पवार यांचे वर्चस्व वाढले आहे
 • पवारांनी निवडणूक लडढण्याआधीच मैदान सोडले
 • सिंचन घोटाळ्याच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रला लुटले.
 • योजना आणून त्यांचे पैसे स्वता:च्या खिशात घालतात.
 • इस्त्रोने आणखी एक इतिहास रजच भरारी घेतली
 • इस्त्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंद
 • मला आशीर्वाद देण्यासाठी लोकांची गर्दी पुरेशी आहे
 • ही गर्दी पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडेल
 • मोदी सरकार वेळे सर्व योजना पूर्ण करणार
 • मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेचे मोदींकडून कौतुक
 • काँग्रेससह विरोधक एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले
 • आघाडी सरकारमुळे विदर्भात दुष्काळ
 • सैन्याचा अपमान करणाऱ्याला धडा शिकवा
 • काँग्रेसने सत्तेत राहून हिंदूचा अपमान केला
 • त्यांच्या काळात किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण पवारांना काहीही फरक पडला नाही.
 • स्वतः एक शेतकरी असून पवार शेतकऱ्यांना विसरले.
 • मावळचे शेतकरी आपल्या अधिकारांसाठी झगडत होते, तेव्हा पवार कुटुंबाने त्यांच्यावर गोळीबाराचे आदेश दिले होते.
 • अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राचा शेतकरी जेव्हा धरणातल्या पाणीटंचाईविषयी विचारणा करायला गेला तेव्हा त्या काय उत्तर मिळाले. ते इथे उच्चारताही येत नाही.

 

 

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…हिंगोली मतदारसंघाबाबत

News Desk

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

योगी सरकारचा ४ लाख ७० हजार ६८४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

News Desk