HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

भाजपची जळगावातील उमेदवारी उन्मेष पाटलांना, स्मिता वाघचा पत्ता कट

जळगाव | लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने आधी आमदार स्मिता वाघ यांनी उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर स्मिता यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट दिल्याने जळगावात खळबळ उडाली. जळगाव मतदार संघात भाजपने उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच संभ्रमावस्था असल्याचे दिसत आहे.

भाजपाचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांचे तिकीट कापल्यापासून भाजपत मोठा अंतर्गत कलह सुरू आहे. स्मिता वाघ यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरून देखील पक्षात दोन गट पडले होते. एकंदरीत दगाफटका टाळण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी धक्कातंत्र देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघातून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील उद्या शेवटच्या दिवशी उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आमदार पाटील यांना तयारीत राहण्यास सांगितले आहे.

तसेच उन्मेष पाटील हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे देखील सर्वत्र चर्चा रंगली आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून दरम्यान, भाजपच्या या निर्णयामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात टक्कर होणार आहे.

Related posts

पंतप्रधान मोदींवरील जीवनपट म्हणजे निवडणुकांमध्ये लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न !

News Desk

#LokSabhaElections2019 : आता भाजपचे सर्वच नेते झाले ‘चौकीदार’, भाजपचे नवे प्रचारतंत्र

News Desk

इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही !

Gauri Tilekar