HW Marathi
राजकारण

कितीही प्रयत्न केलात तरी हे भ्रष्टाचाराचे भूत तुमचा पाठलाग सोडणार नाही !

मुंबई | संरक्षण मंत्रालयातून राफेल लढाऊ विमान करारासंबंधीची अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय अशी कागदपत्रे चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी बुधवारी (६ मार्च) सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. “कागदपत्रे चोरी झाल्यानंतर सरकारने काय पावले उचलली ?”, असा असा सवाल विचारत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी माधिवक्त्यांना सुनावले. दरम्यान, यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून आता भाजपसह पंतप्रधान मोदींना घेरले आहे. राफेल प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हे व्यंगचित्र ट्विट करण्यात आले असून यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टॅग करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे १४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगाई यांनी “राफेल करारात कोणतीही अनियमितता नाही”, असे म्हणत याबाबतच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या होत्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी सुरु असताना राफेल कराराची गोपनीय कागदपत्रे चोरीला गेल्याची माहिती महाधिवक्त्यांनी दिली.

Related posts

मोदींनी दिला जय अनुसंधानचा नारा

News Desk

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आठवले जाणार सर्वोच्च न्यायालयात

News Desk

मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता !

News Desk