HW News Marathi
राजकारण

बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही !

मुंबई | शरद पवार यांना कधी कोणत्या गोष्टीची गंमत वाटेल ते सांगता येत नाही. राजकारणात त्यांनी अनेक गमतीजमती आतापर्यंत केल्या, पण दुसर्‍याने केलेल्या गमतीजमती त्यांना रुचत नाहीत. मालेगाव-दाभाडी परिसरातील हिरे कुटुंबीयांनी मोठा प्रवास करीत, अनेक कोपर्‍यांवर, वळणांवर थांबत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. राजकीय पक्षांमधील ‘जिंकून येणार्‍यां’ची घाऊक पळवापळवी केली जात आहे. एकीकडे पक्षांतर बंदीचे कायदे करायचे आणि दुसरीकडे राजकीय दत्तक विधानांसाठी राजकीय ‘मांड्या’ भाडेपट्टीवर उपलब्ध करून द्यायचा असा सगळा प्रकार सुरू आहे. दत्तकांच्या जोरावर राजकीय ‘मांड्यां’ना बळकटी मिळणे हा विचारांचा पराभव आहे. बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही. गमतीतही गोंधळ आहे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपदकीयमधून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे

सामनाचे आजचे संपादकीय

सर्वपक्षीय मंडळींना ‘दत्तक’ घेऊन भाजपने गेल्या चार वर्षांत विधानसभेपासून जिल्हा परिषदांपर्यंत निवडणुका जिंकल्या. राष्ट्रवादीतलीही अनेक तालेवार खानदाने बेडकासारख्या उड्या मारत भाजपच्या तळ्यात गेली. ही खानदाने आता स्वगृही परतू लागली आहेत. भाजपने किंवा फडणवीस यांनी दत्तक घेतले याची गंमत श्री. शरद पवार यांना वाटते, पण पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तर दत्तक विधानांवरच टिकून आहे. दत्तकांच्या जोरावर राजकीय ‘मांडय़ां’ना बळकटी मिळणे हा विचारांचा पराभव आहे. बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही. गमतीतही गोंधळ आहे.

सन्माननीय शरद पवार यांना कधी कोणत्या गोष्टीची गंमत वाटेल ते सांगता येत नाही. राजकारणात त्यांनी अनेक गमतीजमती आतापर्यंत केल्या, पण दुसर्‍याने केलेल्या गमतीजमती त्यांना रुचत नाहीत. मालेगाव-दाभाडी परिसरातील हिरे कुटुंबीयांनी मोठा प्रवास करीत, अनेक कोपर्‍यांवर, वळणांवर थांबत पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. अखेरच्या क्षणी ते भारतीय जनता पक्षात असल्याचे समजते. हिरे मंडळी भाजपातून राष्ट्रवादीत आली याचा आनंद पवार यांना झाला आहे व त्याच भरात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला मारला आहे. पवार अगदी गमतीने म्हणाले की, ‘काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो. मला गंमत वाटली. आमचे बापजादे आहेत आम्हाला सांभाळणारे. आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही. दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही. स्वकष्टाने, स्वकर्तृत्वाने घर चालवणारे लोक आहोत.’ असे पवारांचे म्हणणे आहे. त्यांचा हा टोला मुख्यमंत्री फडणवीस किंवा भाजपला असला तरी तो खुद्द पवारांनाही लागू पडतो. भारतीय जनता पक्ष हा काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे पक्षांकडून उधारीवर घेतलेल्या लोकांमुळे चालला आहे. थोडक्यात, पक्षात भेसळ आहे हे भाजपने मान्य केले. तुरुंगातून सुटलेले अनेक ‘वाल्या’ व पोलीस ठाण्याच्या पायरीवर सदैव उभे असलेले लोक अशी मंडळी पावन करून घेणे व निवडणूक जिंकणे हा 2014 पासून भाजपचा धंदा झाला आहे. येनकेनप्रकारेण निवडून येऊ शकतील अशा

सर्वपक्षीय मंडळींना ‘दत्तक’ घेऊन

भाजपने गेल्या चार वर्षांत विधानसभेपासून जिल्हा परिषदांपर्यंत निवडणुका जिंकल्या. याचा सगळ्यात मोठा फटका राष्ट्रवादीला बसला. राष्ट्रवादीतलीही अनेक तालेवार खानदाने बेडकासारख्या उड्या मारत भाजपच्या तळ्यात गेली. ही खानदाने आता स्वगृही परतू लागली आहेत व उद्या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच भाजपच्या मांडीवरील अनेक दत्तक विधाने वार्‍याच्या झुळकीबरोबर खालसा होतील. मालेगाव-दाभाडीची हिरे मंडळी त्याच बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन स्वगृही परतली. पण सध्याचे राजकारण हे असेच आहे. प्रत्येकजण आपला मूळ विचार व रंग विसरून दत्तक विधाने घेऊनच राजकारण करीत आहे. भाजपने किंवा फडणवीस यांनी दत्तक घेतले याची गंमत श्री. शरद पवार यांना वाटते, पण पवारांचा राष्ट्रवादी पक्ष तर दत्तक विधानांवरच टिकून आहे. छगन भुजबळ, गणेश नाईक, धनंजय मुंडे ही सर्व मंडळी काय राष्ट्रवादीच्या गर्भातून जन्मास आली? दुसर्‍यांचीच पोरे मांडीवर घेऊन तुम्हीही तुमचे आजपर्यंतचे राजकारण पुढे रेटले आहे. त्यामुळे राजकारणाचा उकिरडा झाला आहे व कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही तो याच दत्तक विकृतीमुळे. खरे तर मूल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया अत्यंत जाचक, कठोर व पारदर्शक आहे. पण राजकारणात कोण कुणाच्या मांडीवर दत्तक म्हणून बसेल व नंतर तीच मांडी फोडून ते दत्तक विधान पुन्हा दुसर्‍या मांडीवर

कधी उडी मारेल

ते सांगता येत नाही. श्री. पवार म्हणतात, आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. हा दिव्य संदेश असला तरी दुसर्‍यांची पोरे पळविण्यासाठी आता श्री. पवारही कणकवलीपासून करमाळ्यापर्यंत दौरा करीत आहेत. विचार, नीतिमत्ता संपली की दत्तक विधान करावे लागते. नाशकात हिरे मंडळीचे भुजबळांशी पटत नव्हते. म्हणून ही मंडळी भाजपात गेली. आता भुजबळांना बळ देण्यासाठी दत्तक मांडी फोडून ती पुन्हा राष्ट्रवादीत आली. हीच तर खरी गंमत आहे. महाराष्ट्रात इतिहास काळापासून दत्तक विधाने गाजली आहेत. काही दत्तक विधाने जनतेने नाकारली आहेत. सध्या जगात ‘सरोगसी मदर’ या नव्या माध्यमातून अपत्यप्राप्ती केली जाते. म्हणजे एखाद्या विवाहितेला गर्भधारणा होणे अशक्यच असेल तर दुसर्‍या स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ वाढवला जातो. अर्थात त्यासाठी अनेक कायदेशीर सोपस्कार आणि बंधने पाळावी लागतात. सध्याच्या राजकारणात मात्र सर्रास बेकायदेशीर आणि अनैतिक ‘राजकीय दत्तक’ विधान केली जात आहेत. राजकीय पक्षांमधील ‘जिंकून येणार्‍यां’ची घाऊक पळवापळवी केली जात आहे. एकीकडे पक्षांतर बंदीचे कायदे करायचे आणि दुसरीकडे राजकीय दत्तक विधानांसाठी राजकीय ‘मांड्या’ भाडेपट्टीवर उपलब्ध करून द्यायचा असा सगळा प्रकार सुरू आहे. दत्तकांच्या जोरावर राजकीय ‘मांड्यां’ना बळकटी मिळणे हा विचारांचा पराभव आहे. बाप कोण, पोरे कोण काहीच कळत नाही. गमतीतही गोंधळ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता या पश्चिम बंगालची संस्कृती, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत !

News Desk

नितीश कुमार यांनी आज घेतली शरद पवार यांची भेट

Aprna

सरकारच्या हुकुमशाहीविरोधात प्रदेश काँग्रेस सेवादलाची तिरंगा पदयात्रा

News Desk