HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण

नवी दिल्ली | उत्तर प्रेदशातील नोएड सेक्टर १५ मधील मतदान केंद्रात ऑन ड्यूटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नेण्यात आलेल्या जेवणावर ‘नमो फूड’ लिहले होते. तर हे मतदान केंद्र कोतवाली सेक्टर २० अंतर्गत येते. या संपूर्ण प्रकर व्हिडिओमध्ये कैद करण्यात आला असून तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता भाजपच्या या प्रकरणा बद्दल निवडणूक आयोग कशा प्रकारे कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या जेवणाच्या पॅकेटवर नमो फूड असे लिहिलेले आहे.

भाजपचे उमेदवार डॉ. महेश शर्मा यांच्या मतदारसंघातील हा संपूर्ण प्रकार झाला आहे. शर्मा हे मतदान केंद्रात जाण्यापूर्वी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. गेल्या काही दिवसांपासून भाजप कोणकोणत्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. झी वाहिनीवर आचारसंहितेचे सारे नियम धाब्यावर बसवत मालिकांच्या माध्यमातून भाजपचा प्रचार सुरू होता. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून पॉलिटीकल पार्टीच्या स्कीम्स प्रमोट करण्यात येत होत्या. यावर निवडणूक आयोगानने आपला आक्षेप नोंदवत कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत आज झी वाहिनीच्या कार्यक्रमांचे प्रसारण ८ ते १० वेळेत बंद राहणार आहे.

 

Related posts

मतदारांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘टॅग मिशन’

News Desk

प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

News Desk

विदर्भाच्या विकासाचा हा झपाटा पाहता स्वतंत्र विदर्भ मागण्याची गरजच राहिली नाही !

News Desk